Skip to main content

Posts

Featured

नील - एक छोटीशी प्रेमकथा

आमच्याकडे दोन तपकिरी रंगाची मांजरीची पिल्लं होतीच जी आम्हाला सिंहगड रोडला सापडली आणि आम्ही लगेच घरी आणली, ती आम्हाला 16 डिसेंबरला मिळाली होती . त्यांनी आमच्या घरचे वातावरण एकदम बदलून टाकले , खूप आनंद, मजा , त्यांच्या अत्यंत गोजिरवाण्या हालचाली, पळापळ,मारामाऱ्या यांत आम्हाला प्रचंड मजा यायची. मी 18 मार्च 2017 ला ऑफिसला काम करत होतो आणि सीमा आणि आकाश मला भेटायला आले आणि म्हणाले की त्यांना निलकंठेश्वरच्या पिकनिकला जातांना एक मांजराचं पिल्लू सापडलं आणि त्यांनी त्याला आणलं आहे, ते अत्यंत अशक्त, अंगावर पिसू असलेलं होतं म्हणून यांनी त्याला डॉ गोर्हे यांच्या क्लिनिकला नेऊन साफ करून आणलं होतं. मला खरं तर हे आवडलं नव्हतं कारण घरात दोन मांजरी असतांना परत आणखी एक कशाला हा विचार आला, त्याला खाली जाऊन बघितलं तर अजूनच नाराज झालो कारण ते एकदम बारीक, हाडे निघालेलं होतं, पण या दोघांनी आणल्यावर काही बोलण्यात अर्थ नव्हता. त्याला घरी नेल्यावर आमची आधीची दोन मांजर भावंडं ( एक बोका त्याचे नाव सोफ्टी आणि त्याची अति आगाऊ बहीण नॉटि ) प्रचंड वैतागले त्याला जवळ जाऊन हुंगलं, भिती दाखवण्याचा प्रयत्नही केला, पण ह

Latest posts